सवलत योजनेला 31 पर्यंत मुदतवाढ द्यावी
पुणे, दि. 31, मे - पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षात मिळकतधारकांना विविध सवलती दिल्या आहेत. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ही सवलत योजना 20 एप्रिलपासून सुरु करण्यात आली. परंतु, प्रशासनाने यामध्ये हलगर्जीपणा केला आहे. मे महिना संपत आला तरी मिळकतधारकांना देण्यात येणा-या बिलांची अद्यापही छपाईच झाली नाही. सवलत योजना केवळ दोन महिन्यासाठीच आहे. त्यामुळे या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.
प्रशासनाने सवलत योजना सुरु करण्याअगोदरच बिलांची छपाई करुन मिळकतधारांकाना देणे आवश्यक होते. त्याचे नियोजन करण्याची गरज होती. परंतु, तसे झाले नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगामुळे मिळकत धारक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होत नाहीत. दफ्तर दिरंगाईबाबत विचारणा केली असता भांडार विभाग हा करसंकलन विभागाकडे बोट दाखवतो. या दोन विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिक सवलतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ही योजना 30 जूनपर्यंतच आहे. आता मे महिना संपत आला आहे. मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्यापही झाली नाही. बिलांची छपाई होण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा उलटणार असल्याचे प्रशासनाने सां गितले आहे. त्यामुळे या योजनाचा लाभ केवळ 20 दिवसच नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दप्तर दिरंगामुळे मिळकत धारक सवलतींपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होणार नाहीत. ही योजना 30 जूनपर्यंतच आहे. आता मे महिना संपत आला आहे. त्यामुळे कर सवलत योजनेला एक महिना म्हणजे 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. मुदवाढ दिल्यास करदात्यांना दिलासा मिळले. ते एकरकमी कराचा भरणा करतील. परिणामी, पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होतील.