Breaking News

तिर्‍हे वाळू उपसा; वाहनचालकांवर कारवाई

सोलापूर, दि. 30, मे - नदीतून अवैध वाळू उपसा करणार्‍या जेसीबीसह वाहतुकीची वाहने पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पकडली. तसेच 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जेसीबीसह दोन हायवा, दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यापैकी पाच वाहनचालकच आहेत. मात्र, वाहन मालकांवर कारवाई न केल्याने ते मोक ळेच सोडले आहे. 

मच्छिंद्र सोनवणे, बिरप्पा वरवटे, आनंद जाधव, राहुल मोटे, दिनेश पाटील, विकास सुरवसे, नितीन रूपनर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तिर्‍हे, पाथरी, शिवणी, पाकणी प रिसरातून राजरोस वाळू उपसा सुरू असल्याची तक्रारी करूनही महसूल व स्थानिक पोलिस कारवाई करण्यास तयार नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी पोलिस उपनिरीक्षक एस. पी. धांडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तिर्‍हे येथील सीना नदीपात्रात छापा टाकला.