Breaking News

विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू; 2 तास मतदेह खांबावर लटकला

कुडाळ, दि. 15 (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील सरताळे काळेवाडी येथे विजेच्या खांबावर काम करत असताना वीज प्रवाह सुरु केल्याने एका खासगी कर्मचार्‍याला आपला जीव गमावला आहे. हणमंत गंगाराम पोतेकर वय 35 असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. हा कर्मचारी सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील असल्याची माहिती समजते आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
सरताळे काळेवाडी येथे विजेच्या पोलवर लाईन ओढण्याचे काम सुरू असताना अचानक पोलवरील वीज प्रवाह सुरु झाला. बघता बघता क्षणात पोलवरील काम करत असलेला खाजगी कर्मचारी मृत्युमुखी पडला. या घटनेने कुडाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजेच्या पोलवर काम करत असताना सरताळे विभागातील हा दुसरा मृत्यू आहे. सुमारे 2 तास मृतदेह पोलवर लटकत होता.