सा. बां. अभियंत्याच्या कार्यालयाच्या दरवाजाला चिटकवले निवेदन पुनद खोर्यातील ग्रामस्थांचा बुधवारी रास्ता रोको
कळवण प्रतिनिधी-- रवळजी फाटा ते देसराणे, नाळीद, इन्शी या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या पुनद खोर्यातील ग्रामस्थांनी येत्या बुधवारी दि. 16 रोजी कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, यासंदर्भातील निवेदन कार्यकारी अ भियंत्याना देण्यासाठी ग्रामस्थ गेले असता संबधित विभागाचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने ऑफिसच्या दरवाजावर निवेदन चिटकवुन ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला.
रवळजी फाटा ते देसराणे, नाळीद, इन्शी या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. नागरीकांना या समस्येला दोन वर्षापासुन तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात दै. लोकमंथन मध्ये र विवार दि. 13 रोजी बातमी ही प्रसिद्ध झाली होती. ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांना नागरीकांचे या रस्त्यामुळे प्रचंड हाल होणार असुन वाटाघाटीत हे काम अडकले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन वर्षापासुन वारंवार निवेदने देवुनही दखल न घेणार्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात रास्ता रोकोचे अस्त्र उपसण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहुर्त लागत नसल्याने नागरीकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वेळोवेळी मागणी करुनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने व काम करण्यास टाळाटाळ होत असल्याने पुनद खोर्यातील सर्वसामान्य नागरीक व शेतकर्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असुन बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.