माजी सभापती दिलीप माने, शिवदारे, इंदुमती अलगोंडांसह 22 जणांवर गुन्हा
सोलापूर - सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी रात्री 22 जणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सभापती दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा आणि बाळासाहेब शेळके यांचा त्यामध्ये समावेश आहे. बाजार समिती निवडणुकीच्या आधीच या राजकीय विस्फोटाने दक्षिण सोलापूरचे राजकारण मात्र ढवळून निघाले.
1 एप्रिल 2011 ते ऑक्टोबर 2011 या कालावधीतील 14 संचालक आणि एक सचिव आणि दुसर्या प्रकरणात 18 ऑक्टोबर ते 2011 ते 17 ऑक्टोबर 2016 या कालावधीतील 20 संचालक आणि दोन सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एकूण 14 मुद्द्यांच्या आधारे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे.
