वाळू तस्करी; 13 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई
सोलापूर, दि. 11, मे - वाळू वाहतूक तस्कर करणा-या मंगळवेढ्यातील तेराजणांवर मोक्का अंतर्गंत कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटील यांना पाठविला होता तो मंजूर झाला.
यांच्यावर झाली कारवाई - रवींद्र उफॅ रमेश काळे, सचीन काळे, सुरेश काळे, किशोर काळे, अमित भोसले, शंकू काळे, संजय भोसले, सूरज भोसले, विक्या भोसले, शरद पवार, राहुल सरवळे, समाधान सरवळे, पृथ्वीराज भोसले या 13 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे. या टोळीचा प्रमुख रवींद्र काळे आहे. तांडोर मंगळवेढा येथून काहीजण चोरून वाळू नेत होते. राहुल सरवळे, समाधान सरवळे हे दोघे कारवाई सापडले होते. त्यावेळी रवींद्र हा घटनास्थळी येऊन पोलिसांवर ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल आहे. काळे याच्या टोळीवर दरोडा टाकणे, चोरी करणे, पिस्तुल बाळगणे असे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मोक्का अंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.