Breaking News

रेतीच्या हायवाने मोटार सायकलस्वाराचे केले तुकडे


येवला: सत्यगाव (ता.येवला) येथील बाळकृष्ण शांताराम दराडे (वय 36) यांच्या पोटावरून वाळू वाहतूक करणारा हायवा (डँपर) गेल्याने शरीराचे दोन तुकडे होवून जागीच निधन झाले. सदर घटना आज गुरूवार दि.26 रोजी दुपारी 2 च्या दरम्यान जळगाव नेऊर ते मुखेड या रस्त्यावर घडली. प्लँटीना दुचाकीवरील मृत्यू झालेले बाळकृष्ण दराडे हे उमराणे सौंदाणे येथे माध्यमिक शिक्षक होते. येवल्यावरून सत्यगाव येथे आपल्या पाच महिण्याच्या चिमुकल्याला भेटायला जात असताना ही घटना घडली.सदर घटनेची माहिती परिसरात कळाल्यावर जळगाव नेऊर येथील असंख्य तरूण वर्ग अपघात स्थळी मदतीसाठी धावले. शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त पडलेले गोळा करून मृतदेहावर लिंबाचा पाला, कापड टाकून झाकून ठेवले होते. अधिक तपास येवला तालुका पोलीस ठाण्याचे पीआय भापकर करत आहे.