Breaking News

डोळा मारणे’ इस्लाममध्ये निषिद्ध ! प्रिया वारियरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ’उरू अडार लव’या चित्रपटातील एका दृश्याला याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्या दृश्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. डोळा मारणे इस्लाममध्ये निषिध्द असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयात हैदराबादमधील दोन गटांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने याप्रकरणावर निकाल देताना धर्मग्रंथ कुराणचा आधार घ्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. तसेच निर्णय देण्यापूर्वी याचिकाकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याविषयी सांगितले आहे. हैदराबादमधील काही मुस्लिम समाजातील लोकांनी प्रियाच्या या गाण्यावर आक्षेप घेतला होता. हे गाणे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यासह प्रिया प्रकाश वारियरवर तक्रार दाखल करण्यात आली होती.’मणिक्या मलराया पूवी’ हे गाणे शान रहमानने संगीतबद्ध केले असून विनीथ श्रीनिवासनने गायले आहे. या गाण्याचे भाषांतर केले असता त्यातून मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता.