Breaking News

हिमाचल प्रदेशात शाळेची बस दरीत कोसळून 14 मुलांचा मृत्यू

कांगडा - हिमाचल प्रदेशातील नुरपूर येथे खोल दरीत शाळेची बस कोसळल्याने 14 मुलांचा मृत्यू झाला असून डझनावर मुले जखमी झाली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बजीर राम सिंह पठानिया मेमोरियल स्कूलची बस 200 फूट खोल दरीत पडली. या अपघातात 14 मुलांचा मृत्यू झाला. जखमी मुलांना विभागीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 45 मुले होती. अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीआरएफची चमू मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली असून मुलांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमी मुलांवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत.