Breaking News

मलेरिया संशोधनावर ६५० कोटींचा खर्च

स्वित्झर्लंडची फार्मा कंपनी नोव्हार्टिस मलेरियावरील नवीन औषधींच्या संशोधनावर पुढील पाच वर्षांत १० कोटी डॉलर (६५० कोटी रुपये) खर्च करणार आहे. डास चावल्याने होणाऱ्या या अाजाराने जगभरात सर्वात मृत्यू होतात. २०१६ मध्ये मलेरियामुळे जगभरात ४.४५ लाख मृत्यू झाले.
 
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूटीओ) नुसार २०१६ मध्ये या आजाराचे २१.६ कोटी रुग्ण समोर आले होते. या आधीच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ५० लाखांनी जास्त आहे. २०१५ मध्ये मलेरियाचे २१.१ कोटी रुग्ण नोंदवण्यात आले होते. सेनेगलने याच आठवड्यात मलेरियाच्या विरोधातील लढाईसंदर्भात आफ्रिकी देशांची परिषद आयोजित केली होती, याच दरम्यान नोव्हार्टिसने ही घोषणा केली आहे.