Breaking News

कठुआ व उन्नाव घटनेचा निषेध आरोपींना फाशी देण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- कठुआ (श्रीनगर) येथे आठ वर्षाच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार तसेच उत्तरप्रदेशात उन्नावमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथून रात्री कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये युवकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवत या प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी देण्याची तर हे प्रकरण दडपणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
कापड बाजार येथून निघालेल्या या कँडल मार्चचा समारोप तेलीखुंट चौकात झाला. या घटनेतील दोन्ही निर्भयांना असोसिएशनच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. पीडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशी हाच एकमेव पर्याय असून, यावेळी फाशीची एकमुखाने मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये असो. चे अध्यक्ष हाजी मन्सूर शेख, निरज काबरा, नईम सरदार, हामजा चुडीवाला, नफिस चुडीवाला, अकलाख शेख, जुनेद शेख, मुफ्ती अल्ताफ, चिराग शेख, जुनेद रंगरेज, महेंद्र गोयल, नवीद शेख, किरण भाऊ, इकराम तांबटकर, आफताब शेख, जावेद अजीज, अन्सार शेख, समीर शेख, शाकिर शेख, तबरेज शेख, सिद्दीक शेख, फैय्याज शेख, गफूर रंगरेज आदिंसह व्यापारी सहभागी झाले होते.