मंदना पतसंस्थेत फुले जयंती उत्साहात
सात्रळ/प्रतिनिधी - राहुरी तालुक्यातील मंदना ग्रामीण बिगरशेती पतसंस्था धानोरेमध्ये महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हीच परंपरा कायमस्वरूपी टिकवून ठेवत या पतसंसंस्थेच्या कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अनेक वक्त्यांनी महात्मा फुलेंविषयी विचार व्यक्त केले. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश ताठे, संचालक विजय कानडे, अजित शिंदे, गोल्ड व्हॅलुअर शामसुंदर डहाळे, गोल्ड व्हॅल्युअर अमोल मालवे, राजू मुंदडा, सोनगावचे पोलिस पाटील संतोष अंत्रे आदी उपस्थित होते.