महात्मा फुले जयंतीनिमित्त सरपंचांसह अनेकांचे रक्तदान!
कोल्हार खुर्द प्रतिनिधी - राहूरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. जवळपास ५१ बाटल्या रक्त या शिबिरात संकलित झाले.
महापुरुषांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करीत असलेल्या येथील तरुणांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. कोल्हार खुर्द ग्रामपंचायत, सावताप्रेमी, फुलेप्रेमी आणि आंबेडकरप्रेमी अशा सर्व ग्रामस्थांच्यावतीने गावात ‘एक गाव एक जयंती’ अशा प्रकारे ग्रामपंचायत कार्यालयाच्या हे शिबिर पार पडले. या प्रांगणात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेसह सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज अशा युग पुरुषांच्या प्रतिमा व्यासपीठावर ठेवण्यात आल्या. फुले जयंतीनिमित्त सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना मानवंदना देण्यात आली.
राहुरी कारखान्याचे संचालक महेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच उषा जाधव, सदस्य दीपक शिरसाठ, किशोर घोगरे, गोरख कानडे, केशव बर्डे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. गोसावी, कृषी अधिकारी संभाजी भिंगार्डे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर शिरसाठ, कोल्हार खुर्द सोसायटीचे चेअरमन प्रभाकर नाना जाधव, प्रतीक पाटील, रामा गुरु दिमोटे, दिग्विजय शिरसाठ, रामनाथ शिरसाठ यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यापुढील काळातदेखील युगपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त गावात अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सरपंच प्रकाश पाटील यांनी यावेळी सागितले.