Breaking News

क्रांतिसूर्य महात्मा फुलेंना ‘प्रवरा’त अभिवादन

प्रवरानगर - प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, एच. आर. मॅनेजर भाऊसाहेब पानसरे, लेखा विभाग प्रमुख बापूसाहेब अनाप, आत्माराम मुठे, एच. आर. मॅनेजर भाऊसाहेब पानसरे, कैलास शिरसाठ, भास्कर घोरपडे, खरेदी विभागाचे प्रमुख विलास वाणी, एकनाथ सरोदे, सिव्हिल विभागाचे स्थापत्य अभियंता भाऊ भवर, विद्युत विभागाचे अभियंता शामराव गायकवाड, एकनाथ तांबे,  सुखदेव गुंजाळ, किसन सरोदे, रमेश म्हसे, दीपक विखे, प्रशांत काकड, सुरेश जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयामधूनही विविध उपक्रम राबवून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.