Breaking News

पैठण शहरात देशी दारू पकडली

ड्राय डे च्या पूर्वसंध्येला ( शूक्रवारी रात्री 8 वाजता) पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या नेतृत्वाखाली पैठण पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई. तहसील कार्यालयाच्या पाठी मागे असलेल्या एका वस्तीतील झाडा झूडपात लपवून - दडवून ठेवण्यात आला होता हा बेकायदा दारू साठा. पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी टाकली घटनास्थळी धाड. या कारवाईत पैठण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विलास दूसिंगे, पो. हवालदार सिराज पठाण, राहूल बचके, पो ना. विक्की जाधव, दिलीप औताडे , विठ्ठल येडके, थेटे, सोनवणे व गोपनीय शाखेचे गणेश शर्मा यांचा समावेश होता. या प्रकरणी फरार आरोपी विरूद्ध पोलीस ठाण्यात मुंबई दारू बंदी कायदा 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसञा मूळे लपूनछपून बेकायदा दारू विक्री करणार्‍यांचे धाबे दणादणले आहे.