पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण
सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी या मार्गावर समता रथ व रॅली काढण्यात आली. या समता रथामध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या वेशभूषा परिधान करून समतेचा संदेश देण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सुनील कोल्हे, बी. बी. सय्यद, राजेंद्र मेहेरखांब, सरपंच वाल्मिक कोळपे, ग्रामविकास अधिकारी एन. डी. खेडकर, प.स. सदस्या पौर्णिमा जगधणे, राहुल जगधने, सिद्धार्थ मेहेरखांब, मोतीराम निकम, रविंद्र देवकर,अंबादास धनगर, विष्णु सोनवणे, दादासाहेब जगताप, अरुण लोंढे आदी उपस्थित होते.
