Breaking News

सप्टेंबर २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण : उद्योगमंत्री सुभाष देसाई


मुंबई : राज्य शासन सप्टेंबर, 2018 मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

स्मॉल मॅन्युफॅक्चर एंटरप्रायजेस (एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री. देसाई बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे प्रमुख डॉ. राजीव कुमार तसेच एसएमईचे प्रमुख चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने उद्योग वाढीला चालना देण्यासाठी अनेक धोरणे राबविली आहेत. परिणामी मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्राद्वारे देश तसेच जगातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली आहे. जगभरातील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. आज आशिया खंडात दोन मोठ्या घटना घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून दोन्ही राष्ट्राचे प्रमुख भेटले आहेत. दुसरीकडे दक्षिण कोरियाचे राष्ट्रप्रमुख एकत्र आले आहेत. भारत-चीन, उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया एकत्र आल्यामुळे जगाचे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासासाठी या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीद्वारे आशिया खंडात क्रांती होण्याची शक्यता आहे, असा विश्वास श्री. देसाई यावेळी व्यक्त केला.