Breaking News

कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणासह प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचवा - मुख्यमंत्री


नागपूर : कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता ‘वनामती’ ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथील ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार अनिल महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, अप्पर मुख्य सचिव विजय कुमार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, वरिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.