Breaking News

चार्‍या खोदाईत वनरक्षकाकडून भ्रष्टाचार

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर वनकुटे परिसरात झाडे लावण्यासाठी सुरु असलेल्या चार्‍या खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करीत, चर्मकार विकास संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देण्यात आले. तसेच या कामातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी स्थानिक कामगारांना डावलून जिल्ह्याबाहेरील ठेकेदार व कामगारांना काम देण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, ग्रा.पं. सदस्य दिपक खामकर, तालुकाध्यक्ष संतोष लोहकरे आदि उपस्थित होते.या कामाची चौकशी करणार्‍या ग्रामपंचायत सदस्य दिपक खामकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन दमबाजी केली असता वनरक्षक किसन रंगनाथ आगलावे यांच्यावर पारनेर पोलिस स्टेशनला नुकताच भादवि 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.