Breaking News

जिल्हा बॅँकेच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थींची गैरसोय

नव्या सीजीएस क्लइरिंग सिस्टीमच्या अभावी राष्ट्रीयकृत बँकांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धनादेश स्विकारणे बंद केले आहे. त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या लाभार्थींना बसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितींचे खाते जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांची रक्कम जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत धनादेशाव्दारे लाभार्थींना दिली जाते. मात्र सदर मदतीचे धनादेश जिल्हा बँकेचे असल्याने राष्ट्रीयकृत बँका ते स्विकारत नसून लाभार्थींची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा बँकेने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.याबाबत कार्ले यांनी जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक रावसाहेब कर्पे यांना निवेदन दिले. यावेळी पं.स.सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, प्रविण कोठुळे, सतिश काळे, सुभाष निमसे, संतोष बहिरट, भाऊ बहिरट, अनिल कोठुळे, बाळू कोठुळे, हेमंत कोठुळे आदी उपस्थित होते. कार्ले यंानी या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हा बँकेचे धनादेश स्विकारण्यास नकार दिला आहे