Breaking News

बँका अाजपासून सलग चार दिवस बंद राहणार.


मार्च एंडमुळे बँकांचे कामकाज दोन ते तीन दिवस बंद होते. आता एप्रिलअखेर जोडून तीन सुट्या व महाराष्ट्रदिनाच्या सुटीमुळे बँकाचे कामकाज २८ एप्रिल ते १ मे असे चार दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत लोकांना एटीएमवरच विसंबून राहावे लागणार आहे. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ रोजी रविवार, ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमा तर १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे बँकांचे कामकाज थेट २ मे रोजी सुरू होईल.