हेमंत शेजवळ यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डी येथील पत्रकार हेमंत शेजवळ यांना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यात दिला जाणारा आदर्श समाज सेवा पुरस्कार नुकताच करण्यात आला. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी न्यायमूर्ती एस. एस. साबणे आ. सीमा हिरे महापौर रंजना भानसी, अन्याय अत्याचार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र जाधव आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. हिरे म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढलेल्या आहेत. प्रत्येकजण त्यासाठी धावपळ करीत असतो. मात्र पत्रकार क्षेत्रात ज्यासाठी धावपळ केली जाते, ती बातमीसाठी असते आणि त्याबातमीतून समाजातील दिनदलित वंचित घटकातील लोकांना न्याय मिळत असतो. त्यासाठी पत्रकार अविरत योगदान देत असतात. त्यामुळेच समाजातच अनेक मोठे बदल होत आहेत. यावेळी सुवर्णा डंबाळे, हिमगौरी आडके, पूनम मोगरे, दीक्षा लोंढे. अॅड. अभया सोनावणे आदींसह राहाता शिर्डी व नगर जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.