Breaking News

संत ज्ञानेश्वर उद्यानमार्गे बस सुरु करा : मागणी


पैठण : येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या गेट क्रमांक एकमार्गे बस सुरु कराव्यात तसेच राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांना जोडणा-या गाड्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रतिसाद संघटनेच्यावतीने करण्यात आली. जेव्हा गेट क्रमांक एक चालू होते तेंव्हा औरंगाबाद-पैठण वाहतूक करणा-या बसगाड्या दुपारी चारनंतर उद्यानाच्या वेळेत गेट क्रमांक एक समोर थांबत असल्याने पर्यटकांची सोय होत होती. परंतू आता पुन्हा सदर गेट चालू झालेले असूनही त्यामार्गे बस वाहतूक नसल्याने बसद्वारे येणा-या पर्यटकांना बसस्थानकावरुन उद्यानाकडे जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यावेळी संघटनेचे विष्णू ढवळे, अॅड. संदीप शिंदे,ईश्वर मोरे, विष्णू सोनार, संदीप वैष्णव, भाऊसाहेब पठाडे, गणेश शिंदे, गणेश जुंजे, ज्ञानदेव कुटे, एकनाथ चांदणे, आनंद क्षिरसागर, शंकर निवारे आदी उपस्थित होते.