Breaking News

सातव्या वेतन आयोगामुळे महागाई दरात वाढ


सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता (एचआरए) वाढवून मिळाल्याने किरकोळ महागाई दरात (सीपीआय) ०.३५% वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. हा एचआरए जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक-पे २.५७ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे एचआरएमध्ये दुरुस्ती होऊन १०५.६ टक्के झाला आहे.