Breaking News

प्रवरा’मध्ये निर्भया ग्रुपद्वारे महिल सबलीकरण

प्रवरानगर :  येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या ‘निर्भया- एक पाऊल बदलाकडे’ या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील १ लाख मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. चा निर्णय घेतला असून लोहारे येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व विकासावर भर देत असते. त्यातीलच एक म्हणजे समाजसेवा. त्यानुसार प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘निर्भया- एकपाऊल बदलाकडे’ या मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यातील सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी लोहारे गावचे सरपंच रुपाली दुशिंगे, प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे, प्रा. संजय गलांडे, प्रा. सतीश शिरसाठ उपस्थित आदी होते. निर्भया हा गट मागील दोन वर्षांपासून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यासाठी काम करत आहे. या आधीही या गटातील मयूर गायकवाड या विद्यार्थ्याला पिलर्स ऑफ नवभारत युथ अवॉर्ड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानव संसाधनमंत्री डॉ. सत्यपाल सिंग आदींच्या उपस्थितीत विद्या ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत प्रतिभा पाटील व मयूर गायकवाड यांनी महिलांना येणाऱ्या पाळी व ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निर्भया ग्रुपमधील राहुल गोरडे, प्रज्ञा औटी, गणेश देवगिरी, ऋषिकेश शिरसाठ, योगेश गोरडे, प्रफुल्ला आहेर आदींनी मुलींमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केली.