Breaking News

शाखा अभियंता दत्तु गितेच्या भ्रष्टाचाराविरूध्द मुख्य अधिकार्‍यांना शिष्टमंडळ भेटणार

भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अंतर्गत गेल्या सोळा वर्षात झालेल्या कामांमध्ये शाखा अभियंता दत्तु गिते यांच्या मनमानीमुळे करोडोंचा घोळ झाल्याची चर्चा आहे. आजपर्यंत ही चर्चा केवळ भिवंडी पुरती मर्यादीत राहील्याने या कामांची ना चौकशी झाली ना दत्तु गितेंचा भ्रष्ट कारभार थांबला. माध्यमांमधील काही मंडळींना हाताशी धरून दत्तु गिते वेगवेगळ्या कामांचा विकास निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च न करता कागदावर कामे दाखवून कंत्राटदार, भिवंडीतील काही पत्रकार यांच्याशी संगनमत करून लाखोंचा निधी या दीड-दोन वर्षाच्या काळातच लाटला.

या संदर्भात काही पत्रकार संघटना आणि समाजसेवी संघटना एकत्र येऊन पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांची भेट घेऊन दत्तु गिते यांच्या भ्रष्ट कर्तृत्वाचा पक्का चिठ्ठा मांडणार आहेत.प्रशासकीय कामकाजाबाबत अज्ञान असलेल्या स्थानिक जनतेच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन शाखा अभियंता दत्तु गिते यांनी नियमित कामांसोबत थेट स्मशानभूमीच्या कामातही पैसे लाटण्याचा प्रमाद केला. दत्तु गीते स्मशानभूमीचा फस्त करून थांंबले नाहीत तर आदीवासी भागातील रस्ते, अकलोली तिर्थक्षेत्रातील गरम पाण्याची कुंडे यासारख्या कामांवरही मंजूर निधी खर्च न करता परस्पर त्याची विल्हेवाट लावली. भिवंडी परिसरातील या एकुण दरोडेखोरीत सामील असलेल्या दत्तु गिते टोळीतील पांढरपेशीं प्रवृत्तींचे पितळ उघडे पाडण्याचा संकल्प काही पत्रकार संघटना आणि समाजसेवी संघटनांनी सोडला आहे. 


दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअभियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर 

एव्हढे मेहेरबान झाले का?
तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?


नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेकडे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...
सोमवारच्या अंकात...


घोडगांंव भोगाडे चा तेहतीस लाखाच्या निधीचा हिशेब काय ?(कार्यारंभ आदेश 24/3/2017) घोडेगाव-कोल्हेपाडा-गोठणपाडा दीड कि.मी.चा रस्ता बेपत्ता कसा झाला?(21/8/2016) अकलोली तिर्थक्षेत्राचा निधी कुणावर उधळला.