Breaking News

अधिक्षक अभियंत्यांचे निलंबन झाले! पण कुणाचे.

मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता याःचे परदेशी पाहुण्यांसोबत प्रशिक्षण सुरू असतांना एका अधिक्षक अभियंत्याचे महाराष्ट्र शासनाने निलंबन झाल्याची चर्चा पसरल्याने एकच खळबळ उडाली मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वांचा एकच प्रश्‍न होता निलंबन झालेले अधिक्षक अभियंता कोण? या बातमीच्ची खातरजमा करून घेण्यासाठी गुरूवारच्या संध्याकाळ पासून लोकमंथनच्या अहमदनगर मुंबई नाशिक पुणे ठाणे औरंगाबाद सांगली बिड बुलढाणा अशा वेगवेगळ्या आवृत्तींशी संबंधीत प्रतिनिधींचे भ्रमणध्वनी खणखणत होते.निलंबन झाले हे वृत्त खरे आहे का? झाले तर तो अधिक्षक अभियंता कोण? निलंबन कुठल्या प्रकरणात झाले असे नाना प्रश्‍न विचारले जात होते.


महाराष्ट्रातून या निलंबनासंदर्भात विचारणा होण्यापुर्वीच एका अधिक्षक अभियंत्याचे निलंबन झाल्याची कुणकुण लोकमंथनला लागली होती.तथापी बातमीची सत्यता पडताळल्याशिवाय बातमी प्रसिध्द करायची नाही हा लोकमंथनचा स्थायीभाव असल्याने लोकमंथनचा चमु या बातमीची सत्यता पडताळीत आहे.तथापी एक गोष्ट नक्की निलंबन आदेशावर स्वाक्षरी झाली आहे.मुख्यमंञी सार्वजनिक बांधकाम मंञी दोघेही मुंबईत नाहीत.हा आदेश या दोघांची प्रतिक्षा करणार ?की तात्काळ अंमलबजावणी होणार एव्हढीच औपचारिकता बाकी आहे.
दरम्यान पुणे मुंबई आणि औरंगाबाद अशा विविध ठिकाणी कार्यरत असतांना नाना कारनामे केलेले कार्यकारी अभियंता आणि नंतर अधिक्षक अभियंता असलेले हे व्यक्तीमत्व असल्याची माहीती लोकमंथनच्या हाती आली आहे.(सविस्तर तपशील उद्याच्या अंकात)