Breaking News

मुळशी धरणात तिघांचा बुडून मृत्यू

पुणे : चेन्नईवरून मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात समर कॅम्पसाठी आलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील तिघेजण कातरखडक गावाजवळील धरणात बुडाली. यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दानिश राजा (वय 13), संतोष के (वय -13) आन्ना (वय -13) अशी धरणात बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील एकाचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी पौडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. रात्र झाल्यामुळे इतर दोघांचे शोधकार्य थांबवण्यात आले असून सकाळी परत त्यांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका शाळेचे 13 ते 15 वयोगटातील 20 विद्यार्थी एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आले होते. आजपासून त्यांच्या कॅम्पला सुरवात झाली होती. आजचा कॅम्प संपल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी कातरखडक गावाजवळ असणार्‍या धरणाजवळ गेले होते. यातील तीन विद्यार्थी अचानक धरणात पडून बेपत्ता झाले.