कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे
मुंबई : शहरातील एल्गार परिषदेचे आयोजक तसेच कबीर कला मंचच्या सदस्यांची घरे तसेच मुंबईतील रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. एल्गार परिषद प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. पुण्यात शनिवार वाड्यावर 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत काही वक्त् यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. त्यानंतर 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले असताना हिंसाचार घडला होता. याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासून पुणे पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. यावेळी कबीर कला मंचच्या पुण्यातील कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकत सर्च वॉरंटच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. पुण्यातील विश्रामबाग आणि सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा नोंद आहे. सहकार नगर पोलिसांबरोबर सायबर क्राईम शाखेचे पोलिस देखील या छाप्यात सहभागी झालेत. यावेळी कबीर कला मंचच्या सदस्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या सीडी, पेन ड्राईव्ह, कोरेगाव भीमाच्या इतिहासाबद्दलची पुस्तके आणि एल्गार परिषदेत कबीर कला मंचने वाटलेली पत्रके पोलिसांनी ताब्यात घेतली.