Breaking News

पारदर्शकतेवर बलात्कार करणार्‍या दत्तु गितेला महाराष्ट्र भुषण देणार का?


पारदर्शक कारभाराचा नारा देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विश्‍वासू मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार या दोघानाही हुल देऊन पारदर्शकतेचे धिंडवडे काढणारे शाखा अभियंता दत्तु गिते यांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी उपहासी मागणी ठाणे जिल्ह्यातून केली जात आहे. सोळा वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहूनही आपल्या भ्रष्ट कर्तृत्वाचा थांग लागू न देणारा दत्तु गिते यांच्या कुट कौशल्याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शाखा अभियंता पदावर काम करणारा शासकीय म्हणजे जनतेचा नोकर असलेला माणूस आपल्या कुवतीचा विचार करून आपली जबाबदारी पार पाडीत असतो. तथापी भिवंडी बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले शाखा अभियंता दत्तु गिते या बाबतीत अपवाद ठरले असून आवाक्याबाहेर जबाबदारी पेलत आहेत. एक नाही दोन नाही तर तब्बल सोळा वर्ष शासन प्रशासनाची दिशाभुल आणि सहकार्यांची चुगली करण्याची तारेवरची कसरत करून भिवंडी उपविभागाचा सुभा त्यांनी राखला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत भिवंडी उपविभाग परगण्याचे उपअभियंता पदाची जहागिरी गेली तीन वर्ष स्वतःच्या ताब्यात ठेवण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.
अर्थात त्यांच्या या परिश्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांची धृतराष्ट्राची भुमिका मोलाची मानली जात असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा शिवसेना नेत्यांचे भक्कम पाठबळ दत्तु गितेंच्या या कसरीतीला पोषक ठरल्याची चर्चा आहे.
दत्तु गितेंचे कर्तृत्व शासनाच्या स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार या उक्तीला दुषण लावत असतांनाही प्रशासन दत्तु गितेंकडून पारदर्शकतेवर राजरोस होत असलेला बलात्कार रोखण्याचे धाडस दाखवित नसल्याने किमान महाराष्ट्र भुषण देऊन त्यांचा सन्मान करण्याचे दातृत्व दाखवावे, अशी उपहासी मागणी पुढे येत आहे.


चौकट
ठाणे जिल्हापरिषदेत दत्तु गितेच्या कर्तृत्वाचे गुलछर्ये
दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअभियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?
तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेकडे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...
उद्याच्या अंकात
दत्तु गितेच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती 
मैदानात उतरणार
ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्र्यासह शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वावर दत्तु गितेला पाठीशी 
घातल्याचा आरोप
उद्याच्या अंकात 
ठाणे जि.प. कडे असलेली एमएमआरडीचे काढून घेण्याची आवश्यकता आहे. कारण कोणताही तांत्रिकदृष्टया प्रगत मनुष्यबळ नसतांना देखील जि.प. ठाणे यांच्याकडे एमएमआरडीचे कामे का देण्यात येतात ? आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असतांना देखील जि.प. ठाणे यांचे आर्थिक वर्ष जुन जुलै पर्यंत कसे सुरू राहते, या सर्व बाबींचा स विस्तर वृत्तात वाचा उद्याच्या अंकात.