‘अमृतवाहिनी’त व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन
संगमनेर : येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासंदर्भात एमएचटी सीईटी २०१८ या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली. आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने ३५ वर्षे गुणवत्ता जपली आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये द़ि. २१ रोजी स़काळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे १२ वी नंतरच्या वेगवेगळ्या शाखेतील प्रवेशासंदर्भात तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.