कर्जतमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जत तालुक्यातील शिंदा येथील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) शेतकऱ्याने सेवा संस्था व खासगी कर्जाला कटांळून विष प्राषणक करून आत्महत्या केली. त्यांच्यापश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षांची मुलगी, वृद्ध आई-वडील , असा परिवार आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील शिंदा येथे काल दि.१६ रोजी रात्री ९ वा. दत्तात्रय देवराव घालमे यांच्याकडे त्यांचा पुतण्या शरद आला असता, ते अस्वस्थ दिसले, त्याने विचारले असता, काका तुम्हाला काय होत आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की, मला एक तर जमीन कमी असून, त्यामध्ये फार काही पिकत नाही,जे पिकते त्याला भाव नाही. माझयावर सेवा सोसायटीचे एक लाखपेक्षा जास्त आणि खासगी सावकाराचे दीड लाख कर्ज आहे शेतामधून मिळणाऱ्या उत्पादनामधून मी कुंटुब चालवू शकत नाही. तर कर्ज कसे फेडणार? यामुळे मी कंटाळून विष पिलो आहे. आता मी जिवंत राहणार नाही,असे म्हणताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे शासकीय रुग्णालयात नेले असता,तेथे डॉक्टरांनी दत्तात्रय घालमे यांना मृत घोषित केले,