Breaking News

शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांना संरक्षण मिळून, त्यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी सन 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याशी सुसंगत शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांची सरकारी कामे तातडीने होवून, उत्पादित शेतमालाला योग्य किंमत मिळून, सावकाराच्या जाचापासून मुक्ती मिळणार आहे. देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व बळीराजाला चांगले दिवस आनण्यासाठी हा कायदा क्रांतीकारक ठरणार असल्याचे संघटनेचे म्हणने आहे.
या मागणीचे निवेदन नुकतेच पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आले असून, या कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी शेतकरी नेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीला केलेल्या आंदोलनामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या असून, या लढ्याला व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर गेले असून, या कायद्यासाठी शेतकर्‍यांचे जन आंदोलन उभे केले जाणार असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. यासाठी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, किरण पाटील, जयाजीराव सुर्यवंशी आदि प्रयत्नशील आहे.