Breaking News

अंतर्गत मेट्रो-पीआरटीएस एकात्मिक मार्गिका अंतिम आराखडा आयुक्तांसमोर सादर

ठाणे, दि. 29, एप्रिल - ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येणा-या अंतर्गत मेट्रो आणि वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा या दोन्ही प्रकल्पाच्या एकात्मिक अंतीम मार्गिका आराखड्याचे सादरीकरण आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी जयस्वाल यांनी महाराष्ट्र मेट्रो, अंतर्गत मेट्रोसह वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा यांचा अंतिम एकत्रित मा र्गिका आराखडा सुचविण्यात आलेल्या बदलांसह पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासंदर्भात आज नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


या बैठकीमध्ये महाराष्ट्र मेट्रोचे सह महाप्रबंधक मनोज दंडारे तसेच वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा (पीआरटीएस) साठी अल्ट्रा फेअरवुडस् इंडिया लि. या कंपनीचे सहयोगी संचालक प्रफुल्ल चौधरी याबाबत गेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मार्गिका आराखडा सादर केला. तथापि एकात्मिक मार्गिका आराखडा तयार करतानाया दोन्ही मार्गिकांमध्ये सुचविलेले फेरबदल करून तो आराखडा पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महानगरपालिका क्षेत्रात एकात्मिक अंतर्गत मेट्रो विकसित होत असलेने त्यापर्यंत पोहोचण्यासाठी 25 किमी लांबीचे नेटवर्क पीआरटीएस यंत्रणेच्या माध्यमातून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी स्टेशन निर्मिती करून 4 ते 6 प्रवाशी क्षमता असलेल्या स्वयंचलित पॉड कारच्या माध्यमातून एकाच दिशेने निश्‍चित स्थळी विना थांबा सरासरी 40 किमी प्रति तास याप्रमाणे प्रवास सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. हे काम पीपीपी तत्वावर अडीच वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे. दरम्यान पीआरटीएसच्या पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे शहर आणि मुंब्रा असा एक त्रित आराखडा सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.