Breaking News

डॉ. माईसाहेब आंबेडकर सभागृहाचा रामदास आठवले यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 29, एप्रिल - सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे दिवंगत डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभागृहाचे आणि जीवक रुग्ण सेवा प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 
दिवंगत डॉ माईसाहेब आंबेडकर यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान कायम होता. 
महापरिनिर्वाणानंतरही डॉ बाबासाहेब अमर असल्याचे सांगत माईसाहेब या कुंकू लावीत असत. मात्र त्याकाळात डॉ माईसाहेबांवर आरोपबाजी करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. मात्र दलित पँथर च्या चळवळीने डॉ माईसाहेब आंबेडकर यांच्यावरील अन्याय दूर केला. पँथर नेते विचारवंत राजा ढाले यांनी अभ्यास करून डॉ माईसाहेब आंबेडकरांवर झालेले आरोप चुकीचे असल्याची भूमिका मांडली होती. डॉ. माईसाहेब आंबेडकरांना काही वाईट करायचे असते तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वीच केले असते मात्र त्यांनी तसे केले नाही. डॉ माईसाहेब आंबेडकरांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मनोभावे सेवा केली होती असे प्र तिपादन रामदास आठवलेंनी केले.