आदर्श पतसंस्थेला ३२ लाखांचा नफा
राहुरी : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला रौप्य महोत्सवी वर्षात दि. ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३१ कोटी ६६ लाख रुपयांच्या ठेवीसह ३२ लाख रुपयांचा नफा झाला, अशी माहिती संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे यांनी दिली. ते म्हणाले, २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये संस्थेने सातत्याने प्रगतीकडे वाटचाल केली आहे. संस्थेच्या ३१ मार्च २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात या संस्थेने ३१ कोटींच्या ठेवीचा पल्ला गाठला आहे. या वाटचालीमध्ये संस्थेचे व्हा.चेअरमन सुधाकर कदम यांच्यासह ठेवीदार, कर्जदार व सभासदांचा मोठा सहभाग आहे.