नगरसेवक गिरवले यांच्या निधनाने नगरमध्ये शोककळा.
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय तोडफोड व बेकायदेशीर फटाके साठा प्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांचे सोमवारी (दि.१६) रात्री ११ च्या सुमारास पुण्यात उपचार सुरु असताना रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. या प्रकाराने त्यांच्या समर्थकांमध्ये एकच शोककळा पसरली. या घटनेमुळे माळीवाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सायकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कै.गिरवलेंचा मृतदेह माळीवाडा परिसरात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले होते. माळीवाडा येथून शिवम थिएटर, जुनी मनपा कार्यालय, कोर्ट गल्ली, टांगे गल्ली मार्गेे ही अंत्ययात्रा अमरधाम स्मशानभूमीत आणण्यात आली. सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले..