कर्नाटक विधानसभा - भाजपकडून दुसरी यादी जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 82 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जातीय तसेच प्रादेशिक समीकरणांचा विचार यादी निश्चित करताना भाजपने केला आहे. यापूर्वीच पक्षाने 72 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 224 विधानसभेच्या जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होत आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 72 उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांच्यासह दोन खासदारांचा उमेदवार यादीत समावेश होता. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा शिकारपूरा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.