Breaking News

यंदाही समाधानकारक पाऊस ! सरासरीच्या 97 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : यंदा देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असून, सरासरीच्या 97 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे बळीराजासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.गेल्या वर्षी भारतीय हवामान विभागाने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता, त्यानुसार पाऊस 95 टक्के पडला, होता. 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा कालावधी समजण्यात येत असून देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 97 टक्के म्हणजेच सरकारी एवढा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याचे महासंचालक के जी रमेश यांनी वर्तवली आहे. यंदा देशात कमी पावसाची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनचे केरळमध्ये आगमन कधी होईल याबाबतची माहिती मेच्या मध्यात दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यंदादेखील हवामान विभागाने 97 टक्के पावसांचा अंदाज व्यक्त केल्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा प हिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वार्‍याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. इतकेच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.