Breaking News

कर्नाटकात काँग्रेसमध्ये बंडाळी ? तिकीट नाकारल्याने पक्ष कार्यालयांची तोडफोड

बंगळुरू : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. तिकिटे नाकारलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी पक्ष क ार्यालयांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेसने रविवारी 218 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पक्षाच्या विद्यमान 12 आमदारांना तिकिटे नाकारण्यात आले आहेत. त्यांच्या जागेवर पक्षाने नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. कर्नाटक काँग्रेसमधील मल्लिकार्जुन खरगे आणि एम.वीरप्पा मोईली यांच्या गटातील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही.आर.सुदर्शन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर पक्ष प्रवक्ते ब्रिजेश कलाप्पा यांनी व्टिटरवरून जाहीर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 218 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाचादेखील समावेश आहे. मात्र, सिद्धझरामय्या यांनी मतदारसंघात बदल केला असून वरूणा या मतदारसंघाऐवजी चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.