भाविनिमगाव / दहिगांव ने प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, विष्णू फटांगरे, दिलीपराव लांडे, रामभाऊ साळवे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाराजी नजन, सरपंच सर्जेराव नजन, बापूसाहेब राशिनकर, शिवनाथ फटांगरे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भातकुडगाव फाटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव , उपाध्यक्ष शंकर मरकड, देवदान वाघमारे, विठ्ठल फटांगरे, यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर क्षीरसागर, दादा सावंत, अस्लम सय्यद, गणेश शिंदे, सचिन काळे, महेश मेरड, संदीप काळे, डॉ हरिश्चंद्र वाघमोडे, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब मनाळ आदी सह व्यावसायिक उपस्थित होते. शहरटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अलका शिंदे, शिवाजी गवळी , राजेंद्र चव्हाण, सुनिल गवळी, संदीप राऊत, संतोष कोल्हे, समिर कोल्हे, संभाजी गवळी ग्रामसेवक रामकिसन आव्हाड ,आत्माराम कुंडकर, अशोक निंबाळकर, संदीप गादे, नाना डोळे, राजु खंडागळे, रामप्पा गिरम, संदीप कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. भाविनिमगाव येथे समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच सिमाताई शाम शिरसाठ, उपसरपंच पांडुरंग मरकड, संजय काळे, अशोक थोरात यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेंद्र शिंदे, संतोष शेळके, सोपान जाधव, सुहास चव्हाण, अनिस पठाण, बाबासाहेब पंडित, आकाश पंडीत, मानियल पंडित, दिनकर शिरसाठ, जालिंदर थोरात, आकाश निकम, यशवंत दळे, आदींसह नागरीक उपस्थित होते. मठाचीवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सतीश धोंडे , उपसरपंच संजय जगदाळे, आत्माराम घुणे, आबासाहेब वाघ, राजु शिरसाठ, प्रभाकर शिरसाठ, सुधीर पंडित, भाऊसाहेब शिरसाठ, योसेप पंडित, भारत खाटीक उपस्थित होते. दहिगाव-ने येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे, भाजपा नेते लक्ष्मण काशिद, प. समिती विस्तार अधिकारी श्री रामकिसन जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पांडुरंग खंडागळे, जगन्नाथ मोरे, भारत घोडके, वाजिद शेख , विकास कसबे, जहांगीर शेख, ग्रामसेवक गोटीराम मडके आदींसह नागरीक उपस्थित होते. येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य विष्णू मरकड उपप्राचार्य गोरक्ष ठोंबळ प्रा. मकरंद बारगुजे, बापूसाहेब लोढे, राजेंद्र पानगव्हाणे, आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. शहरटाकळी माध्यमिक विद्यालय येथे डॉ आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजु मगर, पर्यवेक्षक रामकिसन धुमाळ, सह शिक्षक व विद्यार्थ्यां हजर होते. छाया- अशोक वाघ , मठाचिवाडी.
शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:59
Rating: 5