नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - नेवासा शहर व परिसरात विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.येथील बसस्थानक परिसरात घटनापती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखधान, नगरसेवक दिनेश व्यवहारे, बाळासाहेब आव्हाड, गफूर बागवान, सुरेश लव्हाटे, ईसाक मणियार, विशाल शिनगारे, रमेश राजगिरे, सिद्धार्थ सुखधान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.शहरातील नगरपंचायत चौकात पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी खा.तुकाराम गडाख व अशोक शिंदे यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र तिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पारखे, बाळासाहेब डहाके, भास्कर कणगरे, गणेश गायकवाड, राजेंद्र परदेशी,रणजित चव्हाण, दत्ता गिते, शशिकांत पारखे, रवि चांदणे, महेश पारखे उपस्थित होते. तहसील कार्यालय येथे तहसीलदार उमेश पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. शहरातील आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक रणजित सोनवणे, डॉ.सचिन सांगळे, दत्तात्रय बर्डे, भारत डोकडे, सुरेश नळकांडे, राजेंद्र मापारी, राजेंद्र मुथा, सुनील मोरे, नितीन पाठक, जितू महाले,स्वप्नील साखरे उपस्थित होते. नेवासा फाटा येथे डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी सुशिल धायजे,विजय गाडे,बाळासाहेब केदारे,पं.स.सदस्य रावसाहेब कांगुणे,भास्कर लिहिणार,दादा निपुंगे, मुन्ना चक्रनारायण,संदिप साळवे,सुभाष इंगळे,राजेंद्र साळवे,संतोष साळवे,विकी रोकडे,आदेश साठे व गांवकरी मोठ्या संख्येने हजर होते.
नेवासा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:15
Rating: 5