Breaking News

सोनार समाजाचा सर्वशाखीय राज्यव्यापी विवाह तसेच वधूवर परिचय मेळावा


कर्जत, नरहरी सेना यांच्यावतीने रविवार दि. 8 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे सोनार समाजाचा सर्वशाखीय राज्यव्यापी सामुहीक विवाह व वधुवर परिचय मेळावा होत आहे. याचा फायदा समस्त सोनार समाजाने घ्यावा असे आवाहन नरहरी सेना संस्थापक अध्यक्ष भास्कर टेहरे यानी केले आहे.
 
या सोहळ्यात जास्तीत जास्त विवाह लावले जाणार आहेत. याठिकाणी होणारे विवाह सोहळे विनामूल्य होणार आहेत. समाजातील बाधवांचा व भगिनींचा बहुमुल्य वेळ, पैसे, परिश्रम खर्च होऊ नयेत तसेच उपवर मुला-मुलींना त्यांच्या पालकांना इच्छित व मनासारखे, मनपसंत असलेले विवाह योग्य स्थळे एकाच ठिकाणी पहावयास मिळावी या उद्देशाने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हे विवाह सोहळा भास्कर ठेहरे यांच्या परिश्रमातून आणि मार्गदर्शनाखाली होत आहे. तरी समाजबांधवांनी व संघटनांनी मतभेद याला थारा न देता एकत्रित येऊन हज़ारोंच्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद द्यावेत, समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन सोनार समाजाच्या समाजसेविका मिनाताई सोनार व भगवान शहाणे यांनी केले आहे.