Breaking News

अधिकार्‍यांवर राहिला नाही वचक ; मनमानी कारभार


नगर-श्रीगोंदा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप यांचा प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचक राहिला नसल्याने अधिकारी मनमानी करून गोरगरीब जनतेची पिळवणूक करत आहेत. वाळू तस्करीने गाजलेला श्रीगोंदा तालुक्यात अधिकारी कमी ठेकेदार जास्त असल्यामुळे तालुक्यात बेबंदशाही राजवट असल्याचा आभास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. मात्र अधिकारी वर्ग यामध्ये प्रमुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता बनकर हे बेबनाव करून लाखो रूपायांचे खड्डे बुजविल्याचे भासवून बीले काढून स्वातःचे आणि ठेकेदारांचे उखळ पांढरे करत आहेत. मात्र रस्त्यावरील खड्डे जसेचे तसे आहेत. तसेच दुय्यम निंबधक कार्यालयातील कारभार म्हणजे अधंळे दळते आणि कुत्रे पीठ खाते असाच सुरू आहे. दुय्यम निंबधक कार्यालयातील निंबधक आणि त्यांचे सहाय्यक काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकूनदेखील प्रभारी असलेल्या निबंधकांवर आणि त्यांच्या सहाय्यकांवर याचा कोणताच परीणाम झाल्याचे चालू असलेल्या कारभावरून दिसून येत आहे. 

श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये असलेल्या सर्वच विभागात अर्थपूर्ण तडजोडी करून कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी मिळून पदाधिकार्‍यांना चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून मनमानी कारभार करत आहेत. या आणि सर्वच प्रशासकीय कार्यालयात कमी जास्त प्रमाणात असेच प्रकार सुरू आहेत. मात्र स्वर्गीय कुंडलीकराव जगताप यांचे अधिकारी हताळण्याचे कसब वेगळेच होते. कुंडलीकराव हसत हसत प्रश्‍नांची सोडवणूक करत होते. या गुंणाचा आदर्श घेऊन आमदारांनी ठोस पाऊले ऊचलत अधिकार्‍यांवर वचक निर्माण करावा.