Breaking News

जयंत पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या निर्णयासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. पदाधिकार्‍यांच्या निवडीवर या बैठकीत महत्वपुर्ण चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.