Breaking News

खा. राजू शेट्टी संसदेत मांडणार शेतक़र्‍यांच्या कर्जमाफीसाठी विधेयक


नवी दिल्ली : शेतक़र्‍यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, अशी मागणी करणारे विधेयक आता संसदेत मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. दिल्लीत संसद भवन येथे ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती या देशातील 193 शेतकरी संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार शेट्टी यांच्या वतीने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. शेतकऱयांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीडपट हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीकरिता संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात खासगी सदस्य विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना तसेच शेट्टी यांच्या हालचाली सुरू होत्या. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्याचेही प्रयत्न सुरू होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.