‘व्यंकटेश’चे ठेवीदार अध्यक्षांच्या घरासमोर बोंब मारणार!
ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवित तब्बल ६ कोटी रुपयांच्या ठेवींचा घोटाळा केल्याच्या आरोपामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलॆल्या या पतसंस्थेच्या पदाधिकारी आणि प्रशासनापुढील शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. या पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्यांविषयी ठेवीदरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त पसरली आहे. याप्रकरणी भळगट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात या पतसंस्थेची ‘महत्वाची’ माहिती देण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या अधिकारी आणि कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात काहींनी जामीन मिळविल्याच्या अफवाही परविल्याचे भळगट यांनी सांगितले. दरम्यान, या पतसंस्थेच्या पदाधिकारी अद्यापही मोकाट फिरत असून त्यांच्याविरूद्ध सहकाराचे कलम ८३/८८ कलम लावण्याची मागणी खंडागळे यांनी केली आहे. या पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या ठेवींवर परस्पर कर्ज काढण्यात आल्याचे भळगट आणि खंडागळे यांनी सांगितले.
गोंधळ घालणार्यांना तात्काळ न्याय!
‘पतसंस्थेच्या कर्जाची वसुली करा आणि ठेवीचे पैसे मिळवा’ असा नवा फॉर्म्युला व्यंकटेश पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्ष महाशयांनी शोधून काढला आहे. एखाद्याचे १ लाख रुपयांचे कर्ज असेल तर त्याची ठेवीदाराने वसुली करायची आणि ८० स्वतःची हजाराची पावती कढून घ्यायची, असा हा फंडा आहे. मात्र यात ठेवीदारांचे नुकसान होत आहे. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या ठेवीदारांना हे महाशय तात्काळ न्याय देत असल्याचे निदर्शनास आले आहे.