पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने द्या : आ. थोरात
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, सभापती निशा कोकणे, जिल्हा परिषद कृषी सभापती अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ आरगडे, माजी सभापती अविनाश सोनवणे, शिवाजी थोरात, आर. बी. राहणे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, मिरा शेटे, मिलींद कानवडे, शांता खैरे, पंचायत समिती सदस्य विष्णु रहाटळ, सदाशिव वाकचौरे, किरण मिंडे, सुनंदा जोर्वेकर, प्रियंका गडगे, स्वाती मोरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा कमी पाऊस असलेला तालुका आहे. तळेगांव व पठार भागात पाण्याची मोठी वणवण आहे. कोणत्याही गावातून व वाडी-वस्तीवरुन टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यावर तातडीने टँकर द्यावा. पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असू द्यावे. शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेचा पूर्ण गोंधळ आहे. लोकांना पाणी पहिजे घोषणा नकोत.
तालुक्यात नागरिकांच्या मागणीवरुन तातडीने ट्रान्सफार्मर द्यावे, असे ते म्हणाले, की यासह रस्ते, पाणी, वीज, रोजगार हमी, कृषी अशा विविध विभागांसह आढावा घेण्यात आला. यावेळी विद्युतमंडळाचे डी. बी. गोसावी, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, सुरेश थोरात, दत्तु कोकणे, अभियंता इंगळे, घुले आदींसह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केले. नवनाथ अरगडे यांनी सूत्रसंचलन केले. तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी आभार मानले.