Breaking News

रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाची पायमल्ली!


जामखेड शहर प्रतिनिधी - दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याचे भारतीय रिझर्व बॅंकेने निर्देश दिलेले नसतांना ही नाणी शहरात स्विकारली जात नाहीत. त्यामुळे नागरीकांची मोठी कुचंबना होत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या आदेशाची जामखेड शहरात पायमल्ली होत आहे. 

येथील पेट्रोलपंप, किराणा, दुकान मेडिकल, सहकारी पतसंस्था आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्येही नाणी स्विकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगून रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाकडे डोळेझाक केवली जात आहे. 

जनतेची हेळसांड थांबवा 

राष्ट्रीयकृत बँकाच दहा रूपयांची नाणी स्विकारत नसल्याने ही नाणी बंद झाल्याचा चुकीचा मेसेज जनतेमध्ये जात आहे. संबंधित बँकांना रिझर्व्ह बॅंकेने व सरकारने दिलेल्या निर्देशाबात जबाबदार लोकप्रतिनिधींनी जाब विचारला पाहिजे. जनतेची होणारी हेळसांड थांबवली पाहिजे. - प्रा. राहूल आहिरे