जिल्हा विभाजनाला विरोध नव्हताच ! - डॉ.सुजय विखे
पाथर्डी/विशेष प्रतिनिधी : जिल्हा विभाजनाला विखे कुटुंबाचा कधी विरोध नव्हताच ! परंतु ’जिल्हा विभाजनाबरोबरच, विकासाचीही नितांत गरज आहे.’ या माझ्या विधानाचा स्वतःला सोयीस्कर असलेला अर्थ काढून काही लोक जिल्हा विभाजनाला विखे कुटुंबाचा विरोध असल्याचा कांगावा करून अपप्रचार करीत आहेत. असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील कडगांव येथे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधारा तसेच पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मा.जि.प. सदस्य मोहन पालवे, पं. स. सदस्य राहुल गवळी, काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य संभाजी वाघ, तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतिक खेडकर, सरपंच विष्णुपंत काकडे, माजी सरपंच शंकर शिरसाठ, महादेव कुटे, पृथ्वीराज आठरे, संतोष शिंदे, सुनिल कोरडे, नानासाहेब शिरसाठ, बन्सी शिरसाठ, शिवदास शिदोरे, बाबासाहेब गिते आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.विखे म्हणाले, ’ विखे कुटुंबाची सत्ता असलेल्या सर्व सहकारी संस्थातील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असून त्या सुरळीत चालू आहेत. आजतागायत भ्रष्टाचाराचा एकही आरोप विखे कुटुंबियांवर झालेला नाही. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखांशी आमच्या कुटुंबियांची सातत्याने नाळ जुळलेली असून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची, आमच्या कामाची पद्धत सर्वसमावेशक आहे.
मी सोबत घेऊन जात असलेल्या विचारमंचाला दक्षिणेतील अनेक जण पक्षविरहीत पाठिंबा देत आहेत. या भागातील 28 गावांची तृष्णा भागविणारी, मिरी-तिसगांव ही महत्वाची नळयोजना सुरळीत चालू राहावी म्हणून ती बीओटी तत्वावर सुरु करण्याची गरज आहे. निवडणूका समोर ठेवून इतरांसारखं खोटं बोलणं हे माझ्या स्वभावात बसत नाही. असे डॉ.विखे यांनी सांगितले.